लेखिका नेली हार्पर ली यांचे निधन

लेखिका नेली हार्पर ली यांचे निधन

पुलित्झर पुरस्कार प्राप्त लेखिका नेली हार्पर ली यांचे आज निधन झाले. वयाच्या ८९ वर्षी त्यांचे निधन झाले.

अलाबामात मन्रोव्हिले येथे जन्मलेल्या ली या १९४९ मध्ये न्यूयॉर्कला गेल्या. जुलै १९६० मध्ये त्यांच्या ‘टू कील अ मॉकिंगबर्ड’ या कादंबरीसाठी  पुलित्झर पुरस्कार मिळाला होता.

या पुस्तकावर १९६२ मध्ये सिनेमाही काढण्यात आलाय. २००७ मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यानंतर त्या त्यांच्या मूळगावी वास्तव्य करीत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *