लग्नाच्या वरातीत गोळीबार, नवरदेवाचा गोळी लागून जागीच मृत्यू

लग्नाच्या वरातीत गोळीबार, नवरदेवाचा गोळी लागून जागीच मृत्यू

भर मंडपात गोळीबार झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये घडली आहे. धक्कादायक म्हणजे या गोळीबारात नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. सीतापूरच्या प्रेम नगरमधील गेस्ट हाऊसमध्ये लग्नसोहळा सुरु होता. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे.

नवरदेव अमित वाजत-गाजत जात असलेल्या वरताती घोड्यावर स्वार होता. वरात जेव्हा मंडपाच्या जवळ पोहोचली, तेव्हा वरतीमधील काही जणांनी आनंदाच्या भरात गोळीबार सुरु केला. या गोळीबारादरम्यान एक गोळी नवरदेवाच्या डोक्याला लागली आणि तो जागीच मृत्युमुखी पडला.

गोळी लागल्यावर जागीच पडलेल्या नवरदेवाने तिथेच अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, पोलीस सध्या अमितला चुकून गोळी लागली की, कुणी जाणीवपूर्वक गोळी मारली याचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *