उत्तर प्रदेश माध्यमिक परीक्षा बोर्डात भ्रष्टाचाराचं नवं प्रकरण समोर आलं आहे. आग्र्यातील एका इंटर कॉलेजने दहावी परीक्षेसाठी चक्क क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा फोटो लावून अॅडमिट कार्ड जारी केलं आहे.
आग्र्यात आजपासून दहावी परीक्षेला सुरुवात होत आहे. सुमारे 1.6 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्याच्या एक दिवस आधी हा प्रकार समोर आला आहे. हजेरी क्रमांक 0025488 असलेल्या या अॅडमिट कार्डवर अर्जुन तेंडुलकरचा पासपोर्ट साईज फोटो असून त्यावरील नाव अर्जुन सिंह असं नमूद केलं आहे. अॅडमिट कार्टवर लागलेला हा फोटो दुर्गानगरच्या अंकुल इंटर कॉलेज प्रशासनाने जारी केलं आहे.
यूपी बोर्ड परीक्षेत कॉपी माफियांची किती दहशत किती आहे, याचा अंदाज या घटनेनंतर लावला जाऊ शकतो. अनेक तपासानंतरही शेकडो बनावट विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र जारी केले जातात.
बोर्ड परीक्षेमध्ये हा प्रकार इतका सर्रास सुरु आहे की, आता सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनलाही बोर्डाने तिथला विद्यार्थी असल्याचं दाखवत अॅडमिट कार्ड जारी केलं आहे