आईस्क्रिम विक्रेत्याकडून १०० तलवारी जप्त

आईस्क्रिम विक्रेत्याकडून १०० तलवारी जप्त

जळगाव जिल्ह्यात एका आईस्क्रिम विक्रेत्याकडून १०० तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात एका आईस्क्रिम विक्रेत्याकडून १०० तलवारी जप्त करण्यात आल्या. राजस्थान येथील शिरोही येथून मारुती कार मधून या तलवारी आणण्यात आल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळते.

या विक्रेत्याला अटक करण्यात आली असून त्याचे नाव अद्यापही सांगण्यात आलेले नाही. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *