अमेरिकेत मुलीच्या लग्नासाठी भारतातून आलेला पिता स्वागत समारंभादरम्यान बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
‘प्रसाद मोपार्ती (वय 55, रा. हैदराबाद) असे बेपत्ता झालेल्या पित्याचे नाव आहे. जानेवारीमध्ये ते अमेरिकेत आले होते. फेब्रुवारीमध्ये ते भारतात परतणार होते. दुर्गा या त्यांच्या मुलीचा विवाह पार पडल्यानंतर स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत समारंभादरम्यान मोपार्ती बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे,‘ अशी माहिती पोलिसांनी दिली.
दुर्गा यांनी सांगितले की, माझे वडील विवाहावेळी खूपच खूष होते. त्यांनी नृत्यही केले होते. स्वागत समारंभावेळी ते चालण्यासाठी बाहेर पडले असून, अद्याप ते परतलेलेच नाहीत. त्यांचा शोध सुरू आहे.