कन्नूर जिल्ह्यातील पापीनिसेरी गावाजवळ 27 वर्षाच्या एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे.
सुजीत नावाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणारे कुटुंबियही जखमी झाले आहेत. याबाबत अद्याप सविस्तर माहिती प्राप्त झालेली नाही. त्यामध्ये सुजितचे पालक आणि भावाचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी या हत्येमागे समाजवादी पक्षाचा हात असल्याचा आरोप केला आहे.