कोल्हापूर – शहरातील लक्ष्मीपुरी भागातील चार दुकानांना आज (मंगळवार) पहाटे भीषण आग लागली. या आगीत सुमार आठ दुकाने जळून खाक झाली असून, 60 ते 70 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेतीन वाजता यशवंत एन्टरप्रायजेस या दुकानाला सर्वप्रथम शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली. त्यानंतर आग इतर चार दुकानात पसरली. या आगीत जिवीतहानी झाली नसून, दुकानांचे पूर्ण नुकसान झाले आहे. दुकानातील सर्व माल जळून खाक झाला आहे. आगाची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि सातच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.