पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना विजयी

पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा यांनी 18948 मतांनी विजयी विजय मिळविला आहे.
 
पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कृष्णा घोडा यांचे निधन झाल्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या जागेवर कृष्णा घोडा यांचे पुत्र अमित घोडा व काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यात प्रमुख लढत होती. या लढतीत शिवसेनेच्या अमित घोडा यांनी बाजी मारत 18 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला.
 
या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार मनिषा निमकर तिसऱ्या स्थानावर राहिल्या. शिवसेना-भाजपने या पोटनिवडणुकीसाठी युती केली होती. शनिवारी या पोटनिवडणुकीसाठी जवळपास ६५ टक्के मतदान झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *