हसा

हसा

हसणं हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. हसण्याशिवाय जीवन सुखमय होऊ शकत नाही. पण हसणं ही एक कला आहे का? हसा म्हटल्यावर आपल्याला हसता येईल का? तर नाही. त्यासाठी मनाला तसा उत्स्फूर्त आनंद व्यक्त करण्याची ऊर्मी आली पाहिजे आणि मग येणारं हसू हे निर्भेळ नैसर्गिक हास्य. ह्या हास्याने मनावरील ताण कमी होतो.
घरात एखादा आनंदी प्रसंग घडला तर प्रेमाबरोबर तेथे हास्याचा धबधबाच वाहू लागतो. अशा या आपल्या जीवनात काही प्रसंग आपल्याला स्तब्ध करतात, उदास करतात. काही दु:खद प्रसंग इतके अवघड येतात की वाटतं आपल्या जीवनाला काही अर्थच उरला नाही. काळ हेच त्यावरील औषध असेल तरी त्यातून बाहेर पडणो आवश्यक असते. अशावेळी घरातील लहान मुलांमधे रमणं किंवा खेळणं, आपल्या मनावरील दु:ख कमी करणं. हात उंचावून हसणा:या त्या निष्पाप बालकांकडे पाहून आपल्याही चेह:यावर हास्यरेषा उमटते.
आज अनेक हास्यक्लब निघाले आहेत. रोज पहाटे हसण्याचा येथे सराव केला जातो तो आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी. पहाटेच्या रम्य वातावरणात गालावरील खळी खुलते नि चार मनमोकळे शब्दही आपोआप बाहेर पडतात.
कधी कधी या हास्यरसातून अगदी डोळ्यात पाणीही येते. हे मोतीरूप पाणी वाहू द्या. हे हास्याचे मोती ओघळू द्या गालांवरून. म्हणजे जगण्याचं सोनं होईल!
फ्रान्समधील म्युङिाअममधे लिओनाडरे-द-व्हिन्सीने काढलेले मोनालिसाचे पेंटिंग मी पाहिले. ते अतिसुंदर पेंटिंग पाहताना माझं जणू भान हरपलं. चेहरा भव्य, नितळ शांत नि बोलका, कपाळ मोठे आणि चेह:यावरील ते निर्मळ हास्य म्हणजे जगातील सुंदर हास्य. मोनालिसाच्या त्या पेंटिंगमधे मला सर्वच स्त्रियांची रूपं दिसू लागली. मी त्या पेंटिंगबरोबर फोटो काढले. मायभूमीपासून हजारो किमी दूर येऊन त्या एकाच चेह:यात जगातील सर्व स्त्रियांचे चेहरे मी पाहत होते. तिच्यावरून नजर हटत नव्हती. एक गोड साधं स्मित मनाला उभारी देतं हेच खरं. धैर्य नि सामथ्र्य या सुखद हास्यातूनही लाभतं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *