घरच्या घरी पास्ता

घरच्या घरी पास्ता

उन्हाची चाहूल आता लागायला लागली आहे. दिवसा तरी उन्हाचा चटका जाणवतोच. हीच वेळ आहे, येणा:या उन्हाच्या तलखीला तोंड देण्याची. त्याची तयारी हळूहळू करायला हवी. त्यासाठी या काही खास कूल रेसिपी! या दोन्ही पदार्थाची पूर्वतयारी खूप आधीच करून ठेवता येत असल्यामुळे डब्यासाठी हे दोन्ही पदार्थ सोपे ठरतात.
साहित्य : पास्त्यासाठी- 1 वाटी सोयाबीनयुक्त गव्हाचं पीठ, अर्धी वाटी हरभरा डाळ, 2 चमचे पोहे, राजगिरा, मीठ आणि ऑलीव्ह ऑइल.
सॉससाठी : दीड चमचा गहूपीठ किंवा तांदूळपिठी, 2 चमचे बारीक चिरलेला लसूण, 2 चमचे इटालियन मिक्स हब्जर्, 1 चमचा भरड मीरपूड, मीठ, 2 चिजक्यूब, 1 वाटी मिक्स भाज्या (ब्रोकोली, झुकीनी, टमाटे, स्वीचकॉर्न, फ्रेंच बिन्स, मटार अशा कोणत्याही) दूध, चिलीफ्लेक्स ऐच्छिक.
कृती : पास्त्याची- सगळी पिठं एकत्र करून दूध किंवा पाणी वापरून घट्ट मळून झाकून ठेवावं. पीठ भिजवण्यासाठी आवडीप्रमाणो पालक प्युरी किंवा टोमॅटो प्युरीही वापरता येईल. एखाद्या तासानं पिठाची पोळी लाटून घ्यावी. त्यातून आवडीप्रमाणो पट्टय़ा, बारीक शंकरपाळे असे आकार कातून घ्यावे. पेपरवर किंवा प्लॅस्टिकवर पसरवून वाळवून घ्यावे. वाळल्यावर शक्यतो फ्रीजमधे ठेवावे. 8-10 दिवस छान राहतात. पास्ता करायच्या वेळेला सगळ्या भाज्या मध्यम आकारात चिरून घ्याव्यात. चीज किसून ठेवावं. कढईत तूप आणि बटर गरम करावं. त्यात गहूपीठ / तांदूळपिठी घालून खमंग वास येईर्पयत मंद गॅसवर परतावं. त्यात अर्धा लसूण घालून परतावं. दूध घालून भराभर ढवळावं. गुठळ्या होऊ देऊ नयेत. मिश्रण शिजून साधारण पातळसर झालं की त्यात मीठ, मिरपूड, इटालियन मिक्स हब्जर्, उरलेला लसूण आणि चीज घालून ढवळावं. एकीकडे पास्ता तिप्पट पाणी आणि थोडय़ाशा तेलात शिजवून निथळून घ्यावा. तयार सॉसमधे शिजलेला पास्ता आणि भाज्या घालून ढवळावं. पास्ता डब्यात भरल्यावर त्यावर उरलेलं चीज आणि थोडय़ा चिलिफ्लेक्स घालाव्या.
कडधान्याचा ढोकळा
कडधान्याच्या पिठासाठी साहित्य : प्रत्येकी 1 वाटी मोड आलेली कडधान्यं घ्यावीत,  मटकी, मूग, हरभरा अन्य कोणतीही चालतील.
कृती : मोड आलेली कडधान्यं कडक उन्हात खडखडीत वाळवून घ्यावीत. थोडी भाजून त्याचा जाडसर रवा करून ठेवावा. फ्रीजमध्ये 2-3 महिने चांगला राहतो.
 ढोकळ्यासाठी साहित्य- दीड वाटी कडधान्याचं पीठ,  पाऊण वाटी इडली रवा, चिमुटभर सोडा किंवा छोटं इनोचं पाकीट, मीठ, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता.
फोडणीचं साहित्य : 2 चमचे तेल, खोवलेला नारळ, कोथिंबीर, 1 चमचा आलं-मिरची पेस्ट.
कृती : आदल्या दिवशी रात्री कडधान्याचा रवा आणि इडली रवा भिजवून ठेवावा. ऐनवेळी भिजवला तरी चालेल. ढोकळा करायच्या वेळेला त्यात आलं-मिरची पेस्ट, मीठ आणि इनो/सोडा घालून फेटून घ्यावं. एखाद्या पसरट भांडय़ाला तेल लावून त्यात हे पीठ ओतावं. इडलीपात्रत हे भांडं ठेवून ढोकळा शिजेर्पयत वाफवून घ्यावा. थोडा थंड झाल्यानंतर ढोकळ्याचे तुकडे करून घ्यावेत. मिरच्यांचे तुकडे करावेत. तेल गरम करून त्याची मोहरी, जिरं, हिंग, हळद, मिरची, कढीपत्ता घालून फोडणी करून ढोकळ्यावर घालावी. डब्यात ढोकळा देताना त्यावर खोबरं आणि कोथिंबीर घालून द्यावा. डबा खूप उशिरा खाल्ला जाणार असेल तर मात्र सुकं खोबरं घालावं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *