जागतिक बाजारात तेलाच्या किमती गुरुवारी पुन्हा कोसळल्या. न्यूयॉर्कमध्ये तेलाच्या दरांनी १३ वर्षातील नीचांकी स्तर गाठला असूून २६ डॉलर प्रति बॅरल असा दर राहिला.
तेलाच्या ठप्प झालेल्या बाजारात अति पुरवठय़ामुळे न भरून येणारे नुकसान झाले असून पुरवठय़ात काही घट होईल, अशी कोणतीही शक्यता उरलेली नाही, असे विश्लेषक लुकमन ओटुनुगा यांनी सांगितले.
बुधवारी अमेरिकेतील तेलाच्या साठय़ात आठवडय़ाला ८ लाख बॅरलची घट झाल्याच्या वृत्ताने तेलाच्या किमती काहीशा उसळल्या होत्या.
परंतु गॅसोलिनच्या प्रचंड पुरवठय़ाची दखल व्यापा-यांनी घेतल्याने तेल दर पुन्हा कोसळले.
अमेरिकेतील तेलाचा प्रचंड साठा तेलाच्या किमती उतरवण्यासाठी दबाव टाकत आहे.
ओपेक देशांनी तेलाचे उत्पादन जानेवारीत दिवसाला १ लाख ३० हजार बॅरल्सनी वाढवल्याची माहिती त्यांच्या वृत्तांतात दिल्यावर तेल बाजारात निराशा पसरली.