पश्चिम बंगालमधील सिलिगुडी शहरात बुधवारी एका जंगली हत्तीने धुडगूस घातला. या हत्तीने घरांचे, गाडय़ांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले.
बैकुंठपूर जंगलातून पळालेल्या या हत्तीने सिलिगुडी शहरातील सेवक रोड आणि पायल चित्रपटगृहाजवळ या जंगली हत्तीने धुमाकूळ घातला. अनेक घरांच्या भींती पाडल्या.
काही घरे जमीनदोस्त केली. तर ब-याच वाहनांचे नुकसान केले आहे. या वेळी वन विभागाच्या कर्मचा-यांनी हत्तीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सिलिगुडी जिल्ह्यातील नागरिकांना कायमच हत्तींचा त्रास सहन करावा लागत असून अनेकदा त्यांचे नुकसानही होते.