राजा कृष्णा मेनन दिग्दर्शित ‘एअरलिफ्ट’ हा चित्रपट या वर्षातील १०० कोटीच्या घरात प्रवेश करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच चांगली कमाई केली.
१९९०-९१ मध्ये घडलेल्या सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे कोतूक केले आहे.
यामध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री निमरत कौर प्रमुख भूमिकेत आहेत. अक्षयने यामध्ये दमदार अभिनय केला.
या चित्रपटात अक्षय हा रणजित कटियार या कुवेतमध्ये राहणा-या भारतीय व्यावसायिकाच्या भूमिकेत आहे. कुवेतमध्ये अडकलेल्या १.७ लाख भारतीयांच्या सुटकेचा थरार या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे.