लोकलमधून पडून डोंबिवलीतील तरुणीचा मृत्यू

भावेश नकाते याचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीतीलच धनश्री नंदकिशोर गोडवे या २५वर्षीय तरुणीचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. कामावर जाण्यासाठी धनश्रीने डोंबिवली स्थानकातून सकाळी ८ वाजून ४० मिनिटांची लोकल पकडली.

मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकलने प्रवास करताना डोंबिवली आणि कोपर या स्थानकांदरम्यान बाहेरच्या खांबावर तिचे डोके आपटले आणि ती ट्रेनमधून बाहेर फेकली गेली. त्यात तिचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *