काबूल येथील पोलीस कार्यालयाच्या आवारात कारमध्ये आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला असून यामध्ये १० जण ठार झाले तर २० जण गंभीर जखमी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास हा हल्ला झाला.
काबूलमधील पोलिसांच्या कार्यालयाजवळ एका कारने प्रवेश केला. काही वेळेतच या कारमधून मोठा बॉम्बस्फोट झाला. यामुळे परिसरात १० मृतदेह पडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या आवारात मोठे धुराचे लोट पसरले असल्याचे समजते.
कोणत्याही संघटनेने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्विकारलेली नाही. तालिबानी दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.