रेल्वे रुळावर सेल्फी काढणाऱया तरुणाचा मृत्यू

सेल्फीच्या नादात मुंबईत दोन तरुणींना जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच चेन्नईमध्ये एका १७ वर्षीय तरुणाचा रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेसमोर सेल्फी काढण्याचा प्रताप त्याच्या जीवावर बेतला. दिनेश कुमार या १७ वर्षीय तरुणाने हे जीवघेणे कृ्त्य केले. रेल्वेसमोर सेल्फी काढण्यासाठी दिनेश रेल्वे रुळावर उभा होता. मित्रांसोबत कॅमेराचा अँगल ठरवत असताना दिनेशला रेल्वे आणि रेल्वेरुळाचा अंदाज न आल्याने मागून येणाऱया रेल्वेने त्याला धडक दिली. यात दिनेशचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सेल्फीमुळे मुंबईतील किनाऱयावर दोन तरुणींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईतील समुद्रकिन्यांवर १५ ठिकाणी नो सेल्फी झोन देखील जाहीर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *