सहलीसाठी आलेले पुण्याचे ११ विद्यार्थी रायगमधील मुरूड समुद्र किना-याजवळ बुडाल्याची दु:खद घटना घडली आहे तर चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. बुडालेल्यांमध्ये तीन मुली व ८ मुलांचा समानेश असून ते सर्व जण पुण्यातील इनामदार कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे समजते.
पुण्यातील २० पर्यटकांचा ग्रुप पिकनिकसाठी आज सकाळी मुरूड येथे आला होता. मात्र हे सर्व जण पाण्यात उतरले असता काही जण पाण्यात बुडाले.