उत्तर प्रदेशातील बरोली गावात राहणा-या एका १५ वर्षीय मुलीवर तीन तरुणांनी अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच घडला.
ही मुलगी आपल्या शाळेकडे जात असताना गुरुवारी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. रवी तिवारी, साईराम आणि शीव अशी आरोपींचे नावे आहेत.
पीडितेच्या पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले व घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार केली. पोलिसांनी यावर तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या लहान मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, असे ते म्हणाले.