कुमुदिनी सामूहिक बलात्कार प्रकरणी सहा जण दोषी

कुमुदिनी सामूहिक बलात्कार व खून प्रकरणी सहा जणांना गुरुवारी दोषी ठरवण्यात आले. जून २०१३ मध्ये २१ वर्षीय कुमुदिनीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. दोन आरोपींना मात्र निर्दोष सोडण्यात आले.

अतिरिक्त शहर व सत्र न्यायाधीश संचिता सरकार यांनी सैफुल अली, अन्सर अली, अमिनुल अली, इमानुल इस्लाम, अमिनुल इस्लाम आणि भोला नासकर यांना सामूहिक बलात्कार व खुनाबद्दल दोषी ठरवले.

सैफुल अलीने मुलीला जबरदस्तीने फार्महाऊसमध्ये नेले व सर्वानी तिच्यावर बलात्कार केल्याच्या घटनेमुळे शहर हादरले होते.

सैफुल, अन्सर आणि अमिनुल यांना जास्तीत जास्त २० वर्षे कारावासाची अथवा फाशीची शिक्षा होऊ शकेल तर अन्य तीन आरोपींना २० वर्षे कारावास अथवा जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता आहे. रफिकुल इस्लाम आणि नूर अली यांना पुराव्यांअभावी सोडून देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *