मुंबईतील जुहू समुद्रकिना-यावर गुरूवारी रात्री सुमारे ३० ते ३५ फूट लांबीचा देवमासा मृतअवस्थेत आढळून आला. तो देवमासा ब्रुडीज जातीचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
समुद्राला भरती असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर हा देवमासा वाहून आला आणि जुहू किना-यावरील वाळूत रुतला. हा मासा तब्बल २० टन वजनाचा असल्याचे समजते.
माशाच्या शरिरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या असून त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास करण्यात येणार आहे. वनखात्याकडून रात्रभर या ठिकाणची पाहणी सुरु होती. क्रेनच्या साहय्याने हा मासा हटविण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूतील तूतीकोरिन जवळील तिरुचेंदुर बेटावर ४५ देवमासे मृत अवस्थेत दिसून आले होते.

