पासपोर्ट मिळण्यासाठी लागणारा विलंब टाळण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने पडताळणीमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे आता पासपोर्ट अवघ्या सात दिवसात मिळणार आहे.
अर्जदाराकडे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र आणि पॅनकार्ड हे तीन कागदपत्र असतील तर सात दिवसात पासपोर्ट मिळू शकतो. पासपोर्ट हातात आल्यानंतर पोलीसांकडून पडताळणी केली जाणार आहे.
याआधी नियमित पासपोर्टसाठी अर्ज करणा-या अर्जदारांचे पोलीस पडताळणी होण्यासाठी किमान एक महिना किंवा त्याहून अधिक कालावधी लागत होता. त्यामुळे पासपोर्ट हातात येण्यासाठी चार ते पाच महिने लागत असे.
आता पासपोर्ट हातात आल्यानंतर पोलिसांकडून पडताळणी केली जाणार आहे. पण पोलिसांची पडताळणी पूर्ण करून घेणे ही अर्जदाराची जबाबदारी असणार आहे. अर्जदाराने लवकरात लवकर ही पडताळणी करणे बंधनकारक आहे, जर त्याने ही पडताळणी करून घेतली नाही तर त्याला कारवाईला समोरे जावे लागणार आहे.
‘नव्याने पासपोर्ट प्रक्रियेचे सॉफ्टवेअर आधारकार्डाशी जोडल्यामुळे हे शक्य झाले आहे. अर्जदाराने दिलेली माहिती ही त्याने दिलेल्या कागदपत्रांशी जुळणे आवश्यक आहे,’ अशी माहिती पुणे विभागाचे प्रमुख पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली.