माळशेज घाटात अपघात- 2 ठार, 10 जखमी

माळशेज घाटात अपघात- 2 ठार, 10 जखमी

जुन्नर तालुक्यातील मड येथून मुरबाड, शहापूर तालुक्याच्या दिशेने परतणारा एक टँकर माळशेज घाटात रस्त्यावरून खाली जाऊन पलटी झाल्याने दोघेजण मृत्युमुखी पडले, तर दहाजण जखमी झाले.

घोडेगावला कामाला आलेले काही कामगार टँकरमधून (एमएच 04, टीजी 8388) घरी परतत होते. कल्याणच्या दिशेने जात असताना माळशेज घाटातील आंबा कॉर्नरजवळ टँकर रस्त्यावरून खाली घसरून बाजूच्या खोलगट भागात उलटल्याने हा अपघात झाला.

जखमी झालेल्यांमध्ये हेमंत तुकाराम पारधी, काळू पारधी, परशू अनंत बला (वय 3), संगीता अनंत बला, अनंत लवटू बला (सर्व राहणार- फांगूळ गव्हाण मोरोशी), लक्ष्मण खंडू करवाळे (कुणगे शेलगाव), उषा दत्तात्रेय ठाकरे, मंदा लक्ष्मण करवाळे, काळू चौधरी, ताराबाई मुरेकर (सर्व राहणार- गुंदे शेलगाव) यांचा समावेश आहे.
सर्व जखमी व्यक्तींना आळेफाटा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाजी बोंद्रे असे एका मृताचे नाव आहे. ते अपघातात जागीच ठार झाले. अन्य मृताचे नाव समजू शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *