ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी यांचे निधन

ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी यांचे निधन

ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी (वय 82) यांचे आज (बुधवार) सकाळी आजारपणाने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते पुण्यात झालेल्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
 
अल्पपरिचय – 
– दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी  (जन्म 25जुलै 1934) 
– मराठी कवी व साहित्य समीक्षक
– नागपूर विद्यापीठात पीएच.डी. 
– विदर्भ साहित्य संघाचे ते साहित्य वाचस्पती (डी.लिट.समकक्ष पदवी)
– नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश 
– द.भि. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादांत भाग 
मान-सन्मान : 
– महाराष्ट्र शासन पुरस्कार, दीनानाथ प्रतिष्ठानचा वाग्विलासिनी पुरस्कार 
– नागपूर विद्यापीठाचे ना. के. बेहेरे सुवर्णपदक 
– अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन (पुणे) 
– न्यूयॉर्कच्या हेरल्ड ट्रिब्युनच उत्कृष्ट कथा पुरस्कार 
– महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 
– स्वरूप व समीक्षा”ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार 
– पुरुषोत्तम भास्कर भावे पुरस्कार 
– ‘अंतरिक्ष फिरलो पण‘ ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्‌मय पुरस्कार. 
…………………. 
प्रकाशित साहित्य 
– अंतरिक्ष फिरलो पण.. 
– अन्यनता मर्ढेकरांची 
– अपार्थिवाचा यात्री 
– अपार्थिवाचे चांदणे (आठवणी) 
– स्वरूप व समीक्षा, चौदावे रत्न 
– जीएंची महाकथा 
– जुने दिवे 
– नवे दिवे (ललित लेख) 
– दुसरी परंपरा 
– देवदास आणि कोसला 
– द्विदल 
– पस्तुरी 
– पहिली परंपरा 
– पहिल्यांदा रणांगण 
– पार्थिवतेचे उदयास्त 
– पोएट बोरकर 
– प्रतीतिभेद 
– बालकांचा बगीचा (बालवाङ्‌मय) 
– मराठी वाङ्‌मयाचा इतिहास 
– मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र पुनस्थापन 
– महाकाव्य : स्वरूप व समीक्षा 
– मेरसोलचा सूर्य 
– युगास्त्र 
– समीक्षेची चित्रलिपी 
– समीक्षेची वल्कले 
– समीक्षेची सरहद्द 
– सुरेश भट- नवे आकलन 
– स्फटिकगृहीचे दीप 
– बालकांचा बगीचा 
– हिमवंतीची सरोवरे 
– हिमवंतीची शिखरे 
– ज्ञानेश्वरांची प्रतीतिविश्रांती 
– ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *