येत्या आठ दिवसात राज्यात पोलीस भरती होणार आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगलीत ही माहिती दिलीय.
पाच हजार ४०९ पोलीस कर्मचा-यांची भरती होणार असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलंय. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहितीही शिंदे यांनी दिलीय.