नेताजींच्या अंत्यसंस्काराचे पुरावे उघड

नेताजींच्या अंत्यसंस्काराचे पुरावे उघड

लंडन- गेली सहा दशके नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गूढ आता हळूहळू उलगडत आहे. बोस यांच्यावर झालेल्या अंत्यसंस्काराचे पुरावे ब्रिटिश वेबसाईटने उघड केले आहेत.

ब्रिटनच्या परराष्ट्र खात्याच्या फाईल क्रमांक ‘एफसी १८५२/६’ मध्ये बोस यांच्या अंत्यसंस्कारांची माहिती नोंदवली आहे.

तैपेई येथे १८ ऑगस्ट १९४५ मध्ये बोस यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी तैवानचे अधिकारी तान टी टी यांच्यावर होती.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली २२ ऑगस्ट १९४५ मध्ये हे अंत्यसंस्कार पार पडले. त्यावेळी जपानी लष्करी अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर २३ ऑगस्ट १९४५मध्ये त्यांची राख गोळा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *