सिद्धरामैयांकडून पत्नीला 1 लाखाची वॉटरप्रूफ साडी

फॅशन, दागिने, साड्या याबद्दलचे महिलांचे वेड सर्वज्ञात आहे. पत्नीला खूश करण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी पती तिला साडी गिफ्ट देतात. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैयाही याला अपवाद नाहीत, पण त्यांनी यामध्ये आघाडी घेतली आहे. त्यांनी गिफ्ट दिली वॉटरप्रूफ साडी, तिची किंमत आहे 1 लाख 8 हजार रुपये!

सिद्धरामैया यांच्या हस्ते कर्नाटक रेशीम उद्योगाच्या साडयांच्या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नी पार्वती यांच्यासाठी सोन्याचे धागे असलेली नारंगी रंगाची वॉटरप्रूफ साडी खरेदी केली.
साडी घेताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विकत घेण्याआधी तिची व्यवस्थित पारख केली. साडी वॉटरप्रूफ आहे हे पाहण्यासाठी त्यांनी त्यावर एक तांब्याभर पाणी त्या साडीवर ओतले आणि साडी ओली झाली या खात्री केल्यानंतर त्यांनी येथे शॉपिंग केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *