कोल्हापूरात चालकाचा गाडीवरील ताबा सुटून टेम्पोला भीषण धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात ४८ शालेय विद्यार्थी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळच्या वेळेस घडली.
कोल्हापूरात एका टेम्पोमधून छत्रपती शाहू हायस्कूल आणि गांधीनगर शाळेचे विद्यार्थी रस्ता सुरक्षा सप्ताहासाठी निघाले होते. त्यावेळी टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे टेम्पोला भीषण अपघात झाला.
यामध्ये ४८ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.