इजिप्तमध्ये पोलिसांच्या वाहनात स्फोट, ६ जणांचा मृत्यू

आज पहाटे इजिप्तमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६ मध्ये ३ पोलीसांचा समावेश असल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे.

रॉयटर ने दिलेल्या वृत्तानुसार मिस्रच्या गिजा भागातील पिरामिड कडे जाणाऱ्या रस्त्यावरील झालेल्या गाडीतील शक्तीशाली बॉम्बस्फोट मध्ये ३ पोलिसासह एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक सुरक्षारक्षंकानी सांगितलेल्या माहीती प्रमाणे संदिग्ध दहशतवादी एका इमारतीत लपून बसल्याची माहीती पोलीसांना मिळाली होती. त्या इमारतीकडे जाण्यासाठी आपल्या गाडीत बसल्यानंतर गाडीचा स्फोट झाला.

रॉयटर ने दिलेल्या वृत्तानुसार या स्फोटात ६ जणांनी आपला प्राण गमवला तर १३ जण जण गंभीर जखमी आहेत.

गृह मंत्रालयाने सांगितलेल्या माहितीनुसार दहशतवादी संगठना ब्रदरहुडने हा हल्ला घडवून आणला आहे. घमारतीची तपासणी घेण्यासाठी आलेल्या पोलीसांच्या गाडीत स्पोट घडवला. स्फोटाच स्वरुप पाहता मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *