मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनच्या मुलाखतीची चर्चा सर्वत्र होत असतांना बॉलिवूड अभिनेता आमिर खानने आपल्या सनी लिऑन बरोबर काम करायला काहीही हरकत नसल्याचे म्हटले आहे.
एका टिव्ही चॅनेलने घेतलेल्या मुलाखतीमध्ये सनी लिऑनला तिच्या भुतकाळाबद्दल विचारण्यात आले होते. यावेळी तिला आमिर खान तुमच्याबरोबर काम करेल का?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी सनीने आपण आमिरचे चाहते असल्याचे सांगितले. ‘मी आमिर खानचे चित्रपट पहाते. मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याचे माझे स्वप्न आहे’, असे तिने यावेळी सांगितले होते.
यावर बॉलिवूडमधील कलाकारांसह अनेकांनी मुलाखतकार भुपेंद्र चौबे यांच्यावर आक्षेप घेतला. मात्र, आमिर खानने आपल्याला सनी बरोबर काम करायला आवडेल असे सांगितले.
‘मला तुझ्याबरोबर काम करायला नक्की आवडेल, मुलाखतकाराने म्हटल्याप्रमाणे मला तुझ्या भुतकाळाबद्दल काहीही प्रोब्लेम नाही, असे आमिरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.