नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेत्री असिन अखेर मंगळवारी विवाह बंधनात अडकली. फियान्स मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा याच्याबरोबर तिचा विवाह दिल्ली येथे संपन्न झाला.
मंगळवारी सकाळी चर्चमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाले त्यानंतर एका रिसोर्टमध्ये हिंदू पद्धतीने लग्न विवाह पार पडला. यावेळी फक्त नातेवाईक मंडळी उपस्थित होती. असिनच्या लग्नाला अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंक्ल उपस्थित होते.
बॉलिवूडमधील आपल्या सहकार्यांसाठी येत्या २३ जानेवारी रोजी मुंबईत पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.