मुंबई- व्हॉट्सअॅपच्या युझर्ससाठी आता कंपनीने गुड न्यूज दिली आहे. येत्या काही आठवड्यात व्हॉट्सअॅपचं वार्षिक शुल्क पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपसाठी एक डॉलर म्हणजे ६८ रुपये वार्षिक शुल्क होते.
आतापर्यंत व्हॉट्सअॅपच्या काही युजर्सना एका वर्षानंतर वार्षिक शुल्क आकारले जाते. हे शुल्क भरल्यानंतरच व्हॉट्सअॅपची सेवा एका वर्षासाठी मोफत दिली जात होती. त्यामुळे अनेक युजर्सकडून हे शुल्क घेण्यात येत होते.
‘युजर्सकडे डेबिट, क्रेडिट कार्ड नसते, त्यामुळे आगामी काही आठवड्यांमध्ये व्हॉट्सअॅपच्या सर्व व्हर्जनचे शुल्क हटवले जाणार आहेत, त्यामुळे व्हॉट्सअॅप आता पूर्णपणे मोफत असेल.”, असे कंपनीने एका ब्लॉगद्वारे सांगितले.