सनी लिऑन पुन्हा ‘बिग बॉस’च्या घरात

सनी लिऑन पुन्हा ‘बिग बॉस’च्या घरात

नवी दिल्ली – रियालिटी शो ‘बिग बॉस ५’ मध्ये भाव खावून गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिऑन पुन्हा एकदा ‘बिग बॉस ५’ मध्ये येणार आहे.

पण ती घरची सदस्य म्हणून नाही तर तिचा नवा चित्रपट ‘मस्तीजादे’च्या प्रमोशनसाठी सोमवारी रात्री येणार असल्याची माहिती तिने ट्विटरवर दिली आहे.

तीने ट्विटरवर असे सांगितले की, ‘सर्वांना शुभ प्रभात, सांगा काय? तर मी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाणार आहे, माझा चित्रपट ‘मस्तीजादे’च्या प्रमोशनसाठी’.

सनीला बिग बॉस ५ मुळे भारतात लोकप्रियता मिळाली होती. तिने ४९ व्या दिवशी बिग बॉसच्या घराच प्रवेश केला होता. प्रेक्षकांना तिने आपला सुंदरतेने घायाळ केले होते. त्यानंतच तिला ‘जिस्म २’ या चित्रपटाची ऑफर आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *