पुण्यात जीम मालकावर पार्किंगमध्ये गोळीबार

पुणे : पुण्यामध्ये कोथरूडमध्ये बीग बझारच्या पार्किंगमध्ये गोळीबार झालाय.

सोमवारी राञी ‘गोल्ड जीम’चे मालक शकील बिजापुरे यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्यात. एका बाईकवरून आलेल्या व्यक्तीनं हा गोळीबार केलाय. हा सर्व थरार सीसीटीवीमध्ये कैद झालाय.

बझारच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर बिजापुरे यांचं गोल्ड जिम आहे. रात्री ते जिममधून पार्कींगमध्ये आले आणि आपल्या गाडीत बसले. तिथून बाहेर पडत असताना एकानं त्यांच्या दिशेनं दोन गोळ्या झाडल्या.

सुदैवानं दोन्ही गोळ्या गाडीच्या काचेवर लागल्यानं शकील आणि चालक बचावले. प्रकरणी अभिरूची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गोळीबार कोणी आणि का केला हे अद्याप समजु शकलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *