रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कुर्ला ते सायन रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे कामावर जाणा-या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

धिम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून कल्याणहून सीएसटीच्या दिशेने येणारी वाहतूक उशिराने सुरू आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

घटनास्थळी रेल्वेचे कर्मचारी दाखल झाले असून दुरूस्तीचे काम सुरू आहे. पण ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *