न्यूयॉर्क – फेसबूकचे संस्थापक मार्क झुकरबर्गने अनेक दुरावलेली नाती जोडली त्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून त्याला खूप शुभेच्छा मिळत असतात. पण मार्कच्या शेजा-यांना त्याच्या प्रसिद्धीचा त्रास होत आहे.
मार्कच्या वाहनांमुळे त्याच्या परिसरात पार्किंगची कोंडी होत आहे. घराबाहेर पार्किंगसाठी असलेली जागा मार्कच्या सिक्युरिटी टीमच्या गाडीने आडविल्याचे शेजा-यांचे म्हणे आहे
आता आता आम्ही खुप संयम पाळला आणि शांतही राहिलो परंतू वाहतुकीचा अडथळा, रोज होणारा आवाज आता सहन करणे आमच्या अवाक्याबाहेर झाले असल्याचे पत्र मार्कच्या शेजा-यांनी इतर शेजा-यांना दिले आहे.
यावर मार्कने आपल्या टीमची बाजू मांडत पार्किंग हे स्थानिक नियमांनुसार होत असल्याचे सांगितले. पण जर शेजा-यांना त्रास झाल्याबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे.
