मेरठ- देवीच्या मंदिरात बूट घालून चित्रिकरण केल्याने बॉलिवूड अभिनेते शाहरूख खान आणि सलमान खान यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या १८ जानेवारीला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
कलर्स वाहिनीवरील बिग बॉस या शोच्या चित्रिकरणादरम्यान एका देवीच्या मंदिरात सलमान आणि शाहरूखने बूट खालून चित्रिकरण केले. त्यामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या. मेरठमधील स्थानिक न्यायालयात हिंदू महासभेचे कार्यकर्ते भरत रजपूत यांनी ही याचिका दाखल केली.
न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून येत्या १८ जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे.

