अफगानिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला, १३ ठार

अफगाणिस्तानमधील जलालाबाद येथे  आत्मघातकी दहशतवाद्याने घडवून आणलेल्या स्फोटामध्ये १३ जण ठार झाले तर १४ जण गंभीर जखमी झाले. हा स्फोट रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास झाला.

जलालाबाद येथे नंगरहार येथे प्रांतिय मंडळाचे सदस्य अब्दुल्ला शिनवारी यांच्या निवासस्थानाजवळ हा स्फोट घडविण्यात आला. शिनवारी यांच्या मुलाची तालिबानच्या अटकेमधून सुटका झाल्यानिमित्त आनंद साजरा करण्यात येत असतानाच हा स्फोट घडविण्यात आला.

या स्फोटामध्ये १३ जण ठार झाले तर १४ जण जखमी आहेत. मृताच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानबरोबरील शांतता प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु असल्याने ही या हल्ल्यामागची कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *