ऋतिकला शुटींगदरम्यान दुखापत

मुंबई- बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनला आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दुखापत झाली. ऋतिकने ही बातमी ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना दिली.

ऋतिकचा ‘मोहंजोदडो’ या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान तो खाली पडल्याने त्याला जबर दुखापत झाली. शनिवारी त्याला ही दुखापत झाली असून डॉक्टरांनी त्याला दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहंजोदडो’ या आगामी चित्रपटात ऋतिक प्रमूख भूमिकेत असणार आहे तर त्याच्याबरोबर नवोदित अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे. ‘मोहंजोदडो’ ही एक प्रेमकहाणी आहे.  काही दिवसांपुर्वीच ऋतिकने आपला ४२ वा वाढदिवस मुंबईमध्ये साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *