पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी परिसरातील टाईम्स स्क्वेअर इमारतीला आज (सोमवार) सकाळी भीषण आग लागली. या आगीत जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावणेआठच्या सुमारास टाईम्स स्क्वेअर इमारतीच्या पाचव्या मजल्याला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीत मोठी वित्तहानी झाली आहे.