महिलेची केजरीवालांवर शाईफेक

महिलेची केजरीवालांवर शाईफेक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सम विषम योजना यशस्वी झाल्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एका महिलेने केजरीवाल यांच्या अंगावर शाई फेकल्याची घटना घडली.

प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीत राबविण्यात आलेली सम-विषम योजना यशस्वी झाल्याबद्दल आभार मानण्यासाठी दिल्लीतील छत्रसाल स्टेडिअमवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केजरीवाल बोलत असतांना त्यांच्या मंचाजवळ एक महिला आली आणि तिने केजरीवाल यांच्या अंगावर शाई फेकली. हा प्रकार घडताच सुरक्षा जवानांनी महिलेकडे धाव घेतली.

ही महिला कोण आहे, तिने असे का केले याबाबात अद्याप काहीही समजलेले नाही, मात्र आपण पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सदस्य असल्याचा दावा त्या महिलेने केला.

महिलेले पकडलेले असतांना केजरीवाल यांनी तिला सोडून देण्यास सांगितले. जेव्हा दिल्लीमध्ये काही चांगले घडते तेव्हा असे प्रकार होत असतात असे त्यांनी यावेळी सांगितले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *