पुणे: बॉम्बच्या अफवेने वाहतूक कोंडी

लाल महालासमोर पेशवे गणपती मंदिर येथे आज (शनिवार) संशयास्पद वस्तू आढळली. बॉम्बच्या अफवेमुळे काही काळ या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी मध्यवर्ती पुण्यात दुपारच्या वेळेत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने वाहनचालकांचे व पादचाऱ्यांचे हाल झाले. बॉम्बशोधक पथकाने केलेल्या पाहणीत सापडलेल्या पिशवीत कपडे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिस व नागरिकांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

दोन-तीन आठवड्यांपूर्वीही लाल महाल परिसरामध्ये अशीच घटना घडली होती. गणपती मंदिराच्या बाहेर संशयास्पद वस्तू असल्याचे नागरिकांनी पोलिसांना कळविले. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने तपासणी केली असता त्यात केवळ कपडे असल्याचे स्पष्ट झाले. या तपासणीदरम्यान शनिवारवाड्याकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, कसबा पेठ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *