अंबाजोगाई:मुलांना विष पाजून आईची आत्महत्या

अंबाजोगाई पोलिस ठाण्याजवळ आज (शनिवार) आपल्या तीन मुलांना विष पाजून आईने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, नूरजहाँ शेख (वय 30) यांनी सुरवातीला आपल्या दोन मुले व एक मुलीला विष पाजले आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. राहत्या घरात त्यांनी हे कृत्य केले. नूरजहाँ यांनी मुलगी नेहा (वय 12), मुले शेख तोहिब (वय 8) व शेख अयूब (वय 5) यांनी विष दिले.
 
या कृत्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास करीत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *