सहा आठवड्यांत चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा घट झालीय. शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.

पेट्रोलच्या किंमतींमध्ये ३२ पैसे प्रती लीटर आणि डिझेलच्या किंमतीत ८५ पैशांनी कपात करण्यात आलीय. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किंमतींचा परिणाम भारतात इंधनांच्या किंमतींवर झालाय.

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या सहा आठवड्यांत चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट झालीय.

शुक्रवारी रात्रीपासून मुंबईत पेट्रोलची किंमत ६६.०९ रुपये प्रती लीटर असेल तर डिझेल  ५१.२५ रुपये प्रती लीटर असेल. तर दिल्लीत पेट्रोल ५९.०३ रुपये प्रती लीटर तर डिझेल ४४.१८ रुपये लीटर असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *