जपानमधील नागानोमध्ये एका बसला भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जण ठार झाले तर ३० जण गंभीर जखमी आहेत. ही घटना गुरूवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
जपानमधील नागानोतील स्की रिसोर्टकडे निघालेल्या या बसमध्ये ४१ पर्यटक प्रवास करत होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बसमधील सर्व प्रवासी गाढ झोपेत असतांना अचानक ही बस दरीत कोसळली.
स्की रिसोर्टकडे जाणारा मार्ग चांगला होता, त्यावर बर्फवृष्टीही झाली नव्हती. तरिही हा अपघात कसा झाला याचा तपास सुरू असल्याची माहिती मुख्य कॅबिनेट सचिव योशीहिदे सुगा यांनी दिली.