प्रजासत्ताक दिनानिमित्त सराव करत असताना हवाई दलाचे प्रशिक्षक अभिमन्यु गौड यांना माजी आमदाराच्या मुलाच्या अॉडी कारने धडक दिली. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघातात त्यांचा मृत्यु झाला.
कोलकाता येथे भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षक अभिमन्यु गौड यांना बुधवारी सकाळी ६ च्या सुमाराच आॅडी कारने धडक दिली. त्यावेळी ते प्रजासत्ताक दिनासाठी रंगीत तालीम करत होते. धडक दिल्या नंतर आरोपी अंबीया सोहराब याने तेथुन पळ काढला.
गौड यांना लगेचच ईस्टर्न कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू तेथे त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा आरोपी अंबीया हा कोलकाताचे माजी आमदार मोहम्मद सोहराब यांचा २६ वर्षाचा मुलागा आहे. सोहराब हे २०११ पर्यंत राष्ट्रीय़ जनता दलाचे आमदार होते.
दरम्यान रेड रोडवर परेड चालु असताना तीन सुरक्षाकडे भेदून ही गाडी घटना स्थळापर्यंत कशी पोहचली, याची चौकशी पोलीस करीत आहेत.