पुणे-सातारा महामार्गवर कारची टॅंकरला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात तीनजण जागीच ठार झाले. ही घटना गुरूवारी सकाळी ५.४५ मिनिटांनी घडली.
चिनार राऊत, आयुष आणि अध्यांक कटोर हे तिघे अपघातात ठार झाले तर दोनजण गंभीर जखमी आहेत. हे सर्वजण मुंबईमधील रहिवासी होते.
गुरूवारी सकाळी हे सर्वजण महाबळेश्वर येथे ट्रेकिंगला निघाले होते. पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूरातील वेळू येथे एक टॅंकर उभा होता. कारने मागून येऊन या टॅंकरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात तिघे जागीच ठार झाले तर दोनजण गंभीर जखमी आहेत. त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.