उत्तर जपानमधील होक्काईडू किनाऱ्याला आज (गुरुवार) दुपारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाच्या धक्क्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.
भूगर्भशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेबारा वाजता हा भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.7 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपामुळे अद्याप कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.