कसबा पेठ भागातील माणिक चौकाजवळ बुधवारी परिसरात चोरी करत असल्याच्या संशयावरून एका तरुणाला पेट्रोल टाकून पेटविल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंगार गोळा करण्याचे काम करणारा सावन धर्मा राठोड (वय 17) या तरुणाला चोरटा असल्याच्या संशयावरून इबूर झुबेर आणि इम्रान या दोघांनी पेट्रोल टाकून पेटविले. यामध्ये तो 75 टक्के भाजला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तरुणाला सुरवातीला पेट्रोल पाजल्याचेही वृत्त आहे.
या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.