मायानगरी मुंबईत अंधश्रद्धेपोटी नरबळी देण्याची तयारी

मायानगरी मुंबईत अंधश्रद्धेपोटी नरबळी देण्याची तयारी सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मालाडच्या बंजारीपाडा येथील एका घरात काही लोक नरबळी देण्यासाठी चक्क खड्डा खोदून तयार होते.

खड्ड्याजवळ एका पिशवीत जे सामान सापडलय त्यावरुन येथे काही अघोरी कृत्य होणार होतं, हे स्पष्ट होत आहे. या घरातील हालचालींमुळे शेजारच्या लोकांना शंका आली. त्यांनी पोलिसांना कळवलं आणि हा सर्वप्रकार उघड झाला. यात एका मौलवीसह ४ जण सहभागी असल्याचं समजतंय.

पोलिसांनी घटनेच्या ठिकाणाहून एका आरोपीला ताब्यात घेतलय. मात्र त्याच्या मुलानं इथं सोनं सापडणार होतं आणि त्यासाठी हा खड्डा खणण्यात आला होता असं सांगितलय. पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून यात सहभागी असलेल्या इतरांचाही शोध घेण्याच काम पोलीस करतायत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *