पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, १५ ठार

पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, १५ ठार

पाकिस्तानमधील क्वेटा येथील पोलियो सेंटरजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटामध्ये १५ जण जागीच ठार झाले तर  अन्य २० जण जखमी असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

हा आत्मघाती हल्ला असल्याची शक्यता बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर सर्फराज बुग्ती यांनी वर्तवली आहे. या परिसरात बॉम्बस्फोट झाल्यानंतर गोळीबार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्य पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये १२ पोलीस, एक सैनिक, एक अधिकारी यांचा समावेश आहे. जखमी झालेल्यांना तात्काळ क्वेटा येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *